शांततेचा नोबल पुरस्कार जाहीर

October 7, 2011 9:59 AM0 commentsViews: 7

07 ऑक्टोबर

यादवी आणि गरीबीचा शाप असणार्‍या राष्ट्रामध्ये महिलांच्या हक्कासाठी लढणार्‍या महिलांना या वर्षीचा शांतेतचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहेत. लायबेरीयाच्या अध्यक्षा इलेन जॉन्सन, लेमाह गोब्वी आणि तवक्कूल करमान या तीन महिलांना हा सर्वोच्च बहूमान मिळाला आहे. या तीनही महिला सातत्याने महिलांच्या अधिकार आणि सुरक्षीतेबाबत अहिसक लढा देत आहेत. त्याचाच बहूमान म्हणून त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय नोबेल कमेटीने घेतला. इलेन जॉन्सन या आफ्रिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यात. लेमाह गोब्वी यादवीत होरपळत असलेल्या लिबेरीयात महिलांना एकत्रीत करण्यात मोठी भूमिका बजावली. तवक्कूल करमान यांनी आखाती राष्ट्रातील सर्वात गरीब असणार्‍या येमेनमध्ये महिलांचे अधिकार मिळवून देण्यासाठी तशेच लोकशाही आणण्यासाठी मोठा संघर्ष केला.

close