शिर्डीत दसरा उत्सव

October 6, 2011 7:33 AM0 commentsViews: 4

06 ऑक्टोबर

शिर्डीमध्ये साईबाबांच्या 93 व्या पुण्यतिथीला कालपासून सुरवात झाली. साईंच्या महानिर्वाण नंतर दरवर्षीत शिर्डीत दसर्‍याच्या दिवशी तीन दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचा आजचा मुख्य दिवस आहे. आज पहाटे बाबांची आरती आणि पादुकांच्या मिरवणुकीने दिवसाला सुरवात झाली. साईबाबा हयात असताना ते घरोघरी भिक्षा मागत असत. तीच परंपरा आजही पाळली जाते. आज शिर्डीत भिक्षा मागितली जाते. त्यांनंतर साईबाबांची आराधना करण्यात आली.आज दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत. सर्व भाविकांना दर्शन घेणं सोपे व्हावं यासाठी रात्रभर मंदिर खुलं राहणार आहे.

close