मनसे आमदार सांगळेंना अटक आणि जामीन

October 6, 2011 11:32 AM0 commentsViews: 4

06 ऑक्टोबर

मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांना सरकारी कामात हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. आणि कोर्टात हजर केले असता 10 हजारांचा जामीनावर सुटका करण्यात आली आहेत. भोईवाडा कोर्टाने त्यांना आज एक दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. विक्रोळी स्टेशनवर स्टेशन मास्तर आणि प्रवाशांमध्ये झालेल्या वादात हस्तक्षेप केल्यामुळे सांगळे याना पोलिसांनी आज सकाळी अटक केली होती. काल संध्याकाळी काही प्रवाश्यांनी विक्रोळीतल्या स्टेशन मास्तरांना स्टेशनवरील असुविधांबाबत तक्रार केली. पण त्यानंतर प्रवासी आणि स्टेशन मास्तरांमध्ये बाचाबाची झाली. विक्रोळीतील स्थानिक आमदार मंगेश सांगळे यांनी स्टेशनला जाऊन हस्तक्षेप केला. सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवत, रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केली.

close