शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचा भंग ; गुन्हा दाखल

October 7, 2011 10:23 AM0 commentsViews: 5

07 ऑक्टोबर

शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल आयोजकांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.शिवाजी पार्क पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. पर्यावरण संरक्षक कायदा, 15 (1) मुंबई पोलिस कायद्यांतर्गत 33 (R) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसरा मेळाव्यासाठी मुंबई हायकोर्टात शिवसेनेला 50 डेसिबल आवाजाची परवानगी दिली होती. पण शिवसेनाप्रमुखांसह, उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, रामदास कदम या सर्वांच्या भाषणाने 50 डेसिबल्सची मर्यादा ओलांडली. त्यामुळेच आता मेळावा आयोजकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close