दीक्षाभूमीवर 55 वा धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा सोहळा

October 6, 2011 11:43 AM0 commentsViews: 65

06 ऑक्टोबर

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन म्हणून साजरा केला जातो. या घटनेच्या स्मृती जागवण्यासाठी लाखो बौद्ध बांधव दरवर्षी विजयादशमी म्हणजेच दसर्‍याला दीक्षाभूमीवर येतात.

55 वा धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आज संध्याकाळी 5.30 वाजता दीक्षाभूमीवर पार पडणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक, भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. तर केरळचे राज्यपाल रा.सु.गवई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. गेल्या तीन दिवसापासून दिक्षाभूमीवर संबध देश आणि विदेशातून अंाबेडकरी अनूयायी येत आहेत. यावेळी जवळपास 5 लाख लोक येण्याची शक्यता आहे . जिल्हा प्रशासन, मनपातर्फे या अनुयांयाना सर्व सोयी पुरवण्यात येत आहे. बाहेरुन येणार्‍या गर्दीने शहरातील सर्व रस्ते गजबजून गेलेत. दिक्षाभूमीवर आंबेडकरी अनुयायांसाठी अनेक स्टॉल उभारण्यात आलेत.

close