आंदोलनाच्या गाडीत इतरांनी चढू नये – राज ठाकरे

October 6, 2011 12:46 PM0 commentsViews: 8

06 ऑक्टोबर

मुजोर रिक्षाचालकांना काल मिळालेला धडा हा लोकांच्या उद्रेकातून आहे उगाच याचं श्रेय लाटण्यासाठी इतरांनी प्रयत्न करू नये आंदोलनाची गाडी सुटली आहे इतरांनी यात चढण्याचा प्रयत्न करू नये उगाच गाडी चढून गाडीत असल्याच आव आणणे हा त्यांच्या स्वत: च्या समाधानासाठी आहे लोकांना माहित आहे हे आंदोलन कोणामुळे झालं असा टोला राज ठाकरे यांनी शिवसेनाला लगावला.

काल मुंबईत मुजोर रिक्षाचालकांना राज यांनी दिलेल्या इशार्‍याप्रमाणे 'खळ्ळ','खटॅक' भाषेत समजवण्यात आलं. विक्रोळीत मनसेच्या वाहतूक सेनेनं त्यांच्या सभासद असणार्‍या 200 रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मिटर बसवण्याची मोहीम हाती घेतली. तसेच भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांना 'खळ्ळ', 'खटॅक' भाषेत समजवण्यात आलं. दुसरीकडे शिवसेनेही या कारवाईत हात धुवून घेतले. मातोश्रीवर मोर्चा काढणार्‍या रिक्षाचालकांना शिवसैनिकांनी प्रसाद दिला. शरद रावांची दादगिरी मोडून काढू असा थेट इशारा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिला.तसेच मुंबईत शिवसैनिकांनी रिक्षा फोडल्यात असा दावाही राऊत यांनी केला.

आज पत्रकारांशी बातचीत करताना राज ठाकरे म्हणाले की, रिक्षाचालकांवर झालेली कारवाईही काही परप्रांतीय आहेत म्हणून झाली नाही. रिक्षाचालकांनी चालवलेली दादागिरी,प्रवाशांना लोखंडी सळईने मारहाण हे इंथच थांबले नाही तर पोलिसांवर पण हात उचलला यांच्या यांचं दादागिरीला दिलेलं प्रतिउत्तर आहे. आणि हे सर्व जनतेला माहित आहे. रोज सर्वसामान्यांना या रिक्षावाल्यांचा अत्याचार सहन करावा लागतो. त्यामुळेच त्यांना मनसे स्टाईलने खळ्ळ-खटॅक भाषेत समजावे लागले. आता आंदोलनांची गाडी सुटली आहे. इतरांनी यात चढण्याचा प्रयत्न करू नये उगाच गाडी चढून गाडीत असल्याच आव आणणे हा त्यांच्या स्वत: च्या समाधानासाठी आहे पण लोकांना माहित आहे की आंदोलन कोणामुळे झाले अशी प्रतिक्रिया राज यांनी दिली.

close