स्टीव्ह जॉब्स यांना अखेरचा निरोप

October 7, 2011 12:59 PM0 commentsViews: 1

07 ऑक्टोबर

ऍपलचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्सला आज त्याच्या अमेरिकेतल्या सिलीकॉन व्हॅली इथल्या राहत्या घरी अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. जॉब्सचे काल कॅन्सरनं निधन झालं. निधन संपूर्ण जगाला चटका लावून गेलंय. फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कॅलिफोर्नियातल्या ऍपल्या मुख्यालयातील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आलेत. मुख्यालयाशेजारी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या स्मारकावर पुष्पगुच्छ वाहण्यासाठी लोकांचा रांगा लागल्या आहेत. जगभर पसरलेल्या ऍपल स्टोर्समध्येही लोक श्रध्दांजली वाहतायेत. कॅलीफोर्नीयातील पालो आल्टो इथल्या निवासस्थानाजवळ लोकांच्या रांगा लागल्या आहेत.याच घरात जॉब्सचा अंत्यसंस्कार होणार आहे.

close