कैलास खेरला, राळेगणमध्ये कॉन्सर्ट करायची!

October 7, 2011 1:19 PM0 commentsViews: 3

07 ऑक्टोबर

अण्णांच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या वेळेस 'देश तेरे साथ है' अण्णा हजारे या गाण्याने प्रकाशझोतात आलेला लोकप्रिय गायक कैलाश खेर याला आता अण्णांच्या राळेगणमध्ये कॉन्सर्टकरायची आहे. पुण्यामध्ये त्याने पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यावेळेस कैलाश खेरनं ही इच्छा व्यक्त केली. अण्णा हजारे यांचा लढा यशस्वी व्हावा आणि आपल्याला राळेगणसिध्दीमधे कॉन्सर्ट करायला मिळावा अशी इच्छा आहे असं तो म्हणाला. पुण्यात 8 ऑक्टोबरला कैलाश खेरचा कार्यक्रम होतोय.

close