दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एका संशयिताला अटक

October 7, 2011 1:26 PM0 commentsViews: 4

07 ऑक्टोबर

दिल्ली बॉम्बस्फोटांच्या कटाचा उलगडा करण्यात यश आल्याचा दावा एनआयएने केला आहे. याप्रकरणी मेडिकलचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याला अटक करण्यातआली आहेत. याआधी जम्मू काश्मीरमधून 11 वीत शिकणार्‍या दोन संशयित विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. या दोन संशयितांनी दिलेल्या माहितीवरुन या तरुणाला भारत बांगलादेशाच्या सीमेवरुन अटक करण्यात आली. या तरुणाला आज कोर्टात हजर करण्यात आलंय. वसीम अक्रम मलिक असं या तरुणाचं नाव आहे. त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर याआधी अटक केलेल्या अबीद हुसेन याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. आणि अमीर अब्बास याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

close