पुणेकरांच्या ‘पुण्यभुषण अंकाचे’ थाटात प्रकाशन

October 7, 2011 8:57 AM0 commentsViews: 5

07 ऑक्टोबर

पुण्याला वाहिलेला पहिला दिवाळी अंक असलेल्या पुण्यभुषण दिवाळी अंकाचे प्रकाशन खास पद्धतीने प्रकाशन सोहळा पार पडला. पुणेकरांनी पुणेरी शैलीतच पुणेकरांचं स्वागत केलं गेलं. पुणेकरांच्या मनामध्ये ज्यांना आदराचे स्थान आहे अशा दाजीकाका गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उल्हास पवार आणि पाच अस्सल पुणेकरांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन झालं.

प्रत्येक पुणेकराच्या जीभेवर ज्यांच्या खाण्याची चव रेंगाळते त्या एफसी रोडवरच्या वैशाली रुपालीचे मालक जगन्नाथ शेट्टी, आगळ्या वेगळ्या तर्‍हेने आपलं आयुष्य जगणार्‍या हेमा साने, त्याबरोबरच पुणेकरांची रात्री जिथे मैफील जमते ते गिरिजाचे मालक चंद्रकांत सणस, ज्याच्याकडे मंगेशकर कुटुंबीयांपासुन ते विलासराव देशमुखांपर्यंत अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर पान खायला हजेरी लावतात तो अनिल पानवाला, आणि वैकुंठ मध्ये अंत्यसंस्कारांची जबाबदारी सांभाळणारे मोघे गुरुजी अशा पुणेकरांच्या मुलाखती सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या खास शैली मध्ये घेतल्या.

अनिल पानवाल्याने गायलेलं गाणं. कटाक्षाने वीज न वापरणार्‍या हेमा सानेंनी महावितरणच्‌ा सांगितलेल्या कथा याबरोबरच मोघे गुरुजींनी सांगितलेलं समाजाने उपेक्षित मानण्याचं दुखं अशा सगळ्याच भावनांनी ही दिवाळी अंकाच्या प्रकाशनाची मैफील रंगली.पुणेकरांना वाहिलेला पुण्याचा पहिला अंक संग्रही ठेवतानाच या अंकाचे आगळं वेगळं प्रकाशन करुन युनिक फिचर्स आणि पुण्यभुषण फाऊंडेशनने वेगळा पायंडा पाडला आहे.

close