…या शाळेत सगळेच विद्यार्थी बोगस !

October 6, 2011 7:21 PM0 commentsViews: 4

07 ऑक्टोबर

पट-पडताळणीत संपूर्ण राज्यात अनेक धक्कादायक माहिती उघड झाली. सांगली जिल्ह्यात तर एका शाळेत सगळेच विद्यार्थी बोगस असल्याचे समोर आलं आहे. राजेवाडी गावातल्या शंकरराव मोहिते हायस्कूलमध्ये हा प्रकार उघडकीस आला. या शाळेत अनुसुचित मुलांच्या आश्रमशाळेतील विद्यार्थी बसले होते. या दोन्ही शाळा एकाच संस्थेच्या आहेत. जेव्हा तपासणी झाली तेव्हा हायस्कूलमधल्या सर्व विद्यार्थ्यांची नावं आश्रम शाळेतल्या रजिस्टरमध्येसुद्धा होती. त्यामुळे एकच विद्यार्थी दोन्ही शाळेत दाखवून या संस्थेनं लाखो रुपयांचं सरकारी अनुदान लाटल्याचं उघडच आहे. विशेष म्हणजे या शाळेतल्या गैरकारभाराबाबत गावकर्‍यांनी अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली.

close