सेन्सेक्स 9, 291 वर बंद

November 17, 2008 1:11 PM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर, मुंबई शेअर मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळालाय. सकाळच्या ओपनिंगनंतर मार्केट एकदम निगेटिव्ह मूडमध्ये गेलं होतं पण अंतिम सत्रात थोडी रिकव्हरी मार्केटनं दाखवली. अखेर सेन्सेक्स 94 अंशांनी खाली घसरला आणि सेन्सेक्स 9 हजार 291 च्या स्तरावर बंद झाला तर निफ्टी फक्त दहा अंशानी घसरुन 2 हजार 799 च्या स्तरावर बंद झालाय. आय.टी सेक्टर सोडल्यास इतर सर्व सेक्टर्सनी तेजी गमावलेली दिसली. पण आयटी इंडेक्सही अगदी मामुली तेजी दाखवत बंद झाला. टॉप लूजर्समध्ये एचडीएफसी बँक, रिलायन्स इन्फ्रा, टाटा स्टील आणि डीएलएफ शेअर्स होते तर टॉप गेनर्समध्ये विप्रो, एसीसी, टाटा मोटर्स आणि मारुती सुझकी हे शेअर्स होते.

close