भारत-इंग्लंड सीरिजमधून ‘हॉटस्पॉट’ आऊट

October 7, 2011 3:27 PM0 commentsViews: 10

07 ऑक्टोबर

भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या 14 ऑक्टोबरपासून वन डे सीरिज सुरु होत आहेत. पण या सीरिजमध्ये डिसीजन रिव्हू सिस्टिमचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबद्दल एक पत्रकच जारी केलं. यामध्ये आगामी सीरिजमध्ये डिआरएसचा उपयोग होणार नसल्याचे बीसीसीआयनं म्हटलं आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौर्‍यात हॉट स्पॉट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. पण या तंत्रज्ञानाच्या अचूकतेवर शंका उपस्थित करण्यात आली होती. भारत-इंग्लंड सीरिजदरम्यान हॉट स्पॉट तंत्रज्ञानाला बीसीसीआयचा विरोध निराशाजनक असल्याचे कंपनीनं म्हटलं आहे. 14 ऑक्टोबरपासून भारत-इंग्लंड वनडे सीरिज सुरू होत आहे.

close