डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा फोडल्या

October 7, 2011 5:46 PM0 commentsViews: 6

07 ऑक्टोबर

मुजोर रिक्षाचालकांना विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली आंदोलनाची गाडी आजही सुसाट सुरूच होती. आज डोंबिवलीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 11 च्या सुमारास भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांना मारहाण केली. तसेच डोंबिवली पूर्व भागत बाजीप्रभूचौकात रिक्षांची तोडफोडही केली. मनसेच्या राड्याला प्रतिउत्तर देत पूर्ण डोंबिवलीतल्या रिक्षाचालकांनी बंद पुकारला आहे. या तोडफोडीत मनसेच्या 6 कार्यकर्त्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

close