हिस्सारमध्ये काँग्रेसविरोधात टीम अण्णा रस्त्यावर

October 9, 2011 1:52 PM0 commentsViews: 5

09 ऑक्टोबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केल्याप्रमाणे अण्णांच्या टीमने हरियाणातल्या हिस्सार पोटनिवडणुकीत काँग्रेसविरोधात प्रचार सुरू केला आहे. अण्णांनी एका व्हिडिओद्वारे हिस्सारच्या मतदारांना आवाहन केलं आहे. 'भ्रष्ट सरकार' असं या 10 मिनिटांच्या व्हीडीओ क्लीपचं नाव आहे. काँग्रेस सरकार जनलोकपाल विधेयक आणायला टाळाटाळ करतंय, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभूत करा असं आवाहन टीम अण्णांनी मतदारांना केलं आहे. 13 ऑक्टोबरला हिस्सारमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारपासूनच अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया त्याठिकाणी काँग्रेसविरोधात प्रचार करत आहे.

close