बारामतीत ‘डॉग रेस’ स्पर्धेचे आयोजन

October 9, 2011 2:07 PM0 commentsViews: 12

09 ऑक्टोबर

बारामती इथं राज्यस्तरीय डॉग रेसिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. दिल्ली, पंजाब आणि कर्नाटकबरोबरच स्वीडनमधल्या श्वानांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. बारामती रेसिंग क्लबच्या वतीने ही स्पर्धा भरवण्यात आली होती. यामध्ये 200 हून अधिक श्वान सहभागी झाले होते. यामध्ये ग्रे हाऊंड, पस्मी, कारवान या जातीचे श्वान आहेत. बारामती इथल्या टी. सी. कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धा होत आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. या रेसमध्ये प्रथम येणा-या श्वानास पाच तोळ्याचे सोन्याचे मेडल देण्यात येणार आहे.

close