नाशिकमध्ये पुन्हा वाहनं जाळण्याची घटना

October 9, 2011 9:43 AM0 commentsViews: 2

09 ऑक्टोबर

नाशिकमध्ये तपोवन परिसरात पार्किंगमधल्या दोन दुचाकी गाड्या जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली. नितीन महाजन यांच्या नावावर या गाड्या आहेत. ते महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेच्या येवल्यातल्या कॉलेजमध्ये क्लार्क म्हणून काम करतात. महाजन या शिक्षण संस्थेतल्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्षही आहेत. हे काम करत असताना आपल्याला संचालकांकडून सातत्याने धमक्या येत असल्याची त्यांची तक्रार आहे. संस्थेच्या गैरव्यवहाराबाबत 11 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसण्याचा महाजन यांनी इशारा दिला होता. त्यातूनच हा प्रकार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान संस्थेच्या संचालकांनी मात्र या प्रकाराबाबत आमचा काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिलंय. उपनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

close