संतसाहित्य संमेलनात राजकीय मंडळी नको,वारकर्‍यांची मागणी

October 9, 2011 9:51 AM0 commentsViews: 3

09 ऑक्टोबर

नाशिकमध्ये होऊ घातलेलं पहिलंच अखिल भारतीय संत साहित्य संमेलन वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. येत्या 11 नोव्हेंबरला नाशिक याठिकाणी हे संमेलन होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि या संमेलनाचे आयोजक विठ्ठल पाटील यांनी केली. आणि इथूनच वादाची सुरुवात झाली. पंढरपुरात संत तनपुरे मठात शनिवारी झालेल्या वारकरी संघांच्या बैठकीत यावर चांगलीच वादावादी झाली. वारकरी संप्रदायातील मंडळींना यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नको आहे. मुळात संमेलनाची जागाच ठरली नव्हती, मग संमेलन नाशिक मध्येच का होतंय पंढरपुरात का नाही असा सवाल या बैठकीत उपस्थित झाला. शिवाय कुठलेही राजकारणी आयोजक नकोच असाही बैठकचा सूर होता. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

close