नगरसेवक शितोळेला अटक करा अन्यथा आत्मदहनाचा ढोरे कुटुंबाचा इशारा

October 9, 2011 4:02 PM0 commentsViews: 6

09 ऑक्टोबर

पिंपरी-चिंचवड महापालिकेतला राष्ट्रवादीचा नगरसेवक प्रशांत शितोळेला त्वरीत अटक न झाल्यास आपण सहकुटुंब आत्मदहन करू असा इशारा मृत तुषार ढोरेच्या वडिलांनी दिला. प्रशांत शितोळेवर तुषारच्या खुनाचा गुन्हा दाखल असून तो 6 दिवसांपासून फरार आहे. 4 ऑक्टोबरला पिंपरीतल्या सांगवीमध्ये निघालेल्या मिरवणुकीत दोन गटात झालेल्या मारामारीत तुषारचा मृत्यू होता. तुषारचा खून केल्याप्रकरणी शितोळेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शितोळेवर कारवाई करेल अशी आशा ढोरे कुटुंबीयांना होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शितोळेची पाठराखण केल्यानंतर ढोरे कुटुंबीयांनी आत्मदहनाचा इशारा दिला.

close