ताडोबा व्याघ्र प्रकल्प सर्वांसाठी खुला

October 9, 2011 10:33 AM0 commentsViews: 18

09 ऑक्टोबर

वाघांच्या प्रजनन काळात पर्यटकांचा त्रास होऊ नये म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आता 1ऑक्टोबरपासून पुन्हा खुला करण्यात आला आहे. तसेच एक ऑक्टोबरपासून वन्य जीव सप्ताहाची देखील सुरूवात झाली आहे. आणि त्यातच हा प्रकल्प सुरू करण्यात आल्याने पर्यटक आनंदीत झाले आहे. व्याघ्र प्रकल्प पुन्हा खुला झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी 200 हून जास्त पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली. ताडोबामध्ये वाघांसोबतच रानगवा, हरणं, बिबटे, अस्वलं आणि सांबर आहेत. व्याग्र प्रकल्प पुन्हा खुला झाल्याने पर्यटकांना हे सगळे वन्यजीव जवळून पाहण्याची पर्वणी मिळतेय.पावसाळ्यात वन्य जीवांचा प्रजनन काळ असतो.त्यांना पर्यटकांचा त्रास होऊ नये तसेच या काळात पावसामुळे रस्तेही खराब झालेले असतात. त्यामुळे पहिल्यांदाच ताडोबा प्रकल्प दोन महिने बंद ठेवण्यात आला होता. आता तो पुन्हा खुला करण्यात आला आहे.

close