अण्णांना भाजपकडून राष्ट्रपतीपदाची ऑफर – दिग्विजय सिंग

October 9, 2011 4:53 PM0 commentsViews: 22

09 ऑक्टोबर

भाजप अण्णांना राष्ट्रपती पदाचं स्वप्न दाखवत आहे. पुढच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अण्णांना सर्वदलीय उमेदवार म्हणून पुढे करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि अण्णा त्यांच्या या आमिषाला बळी पडले आहेत असा आरोप काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला आहे. काँग्रेसने जनलोकपाल विधेयकाला पास केले नाही तर काँग्रेस विरोधात प्रचार करीन असा इशारा अण्णांनी दिला होता. आज हिस्सारमध्ये टीम अण्णा काँग्रेसविरोधात रस्त्यावर उतरली आहे. हिस्सारमधल्या पोटनिवडणुकीतील टीम अण्णांच्या प्रचाराचा देशातील इतर भागांवर काहीही परिणाम होणार नाही असा दावा काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनी केला. त्याचबरोबर अण्णांना राळेगणवासीयांनी महात्मा उपाधी देऊ पाहत आहे त्यावरही दिग्विजय यांनी टीका केली. राळेगणकरांच्या भावनांबद्दल हरकत नाही, पण मग महात्म्यानं राजकारणापासून दूर राहावे असा उपरोधिक टोलाही दिग्विजय यांनी लगावला. भाजपनं मोठं पद देण्याचं आश्वासन दिल्यानंच अण्णा काँग्रेस विरोधात प्रचार करत असल्याचंही दिग्विजय सिंग म्हणाले आहे.

अण्णांनी हिवाळी अधिवेशानापर्यंत थांबावे – देशमुख

अण्णांची भुमिका योग्य नाही. हिवाळी अधिवेशनापर्यंत अण्णांनी थांबयला पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. आता लगेच तत्काळ विरोध करण योग्य नाही आणि चर्चेची संधी आम्हाला देऊन त्यांनी मगचं आपली भूमिका घ्यायला हवी असं केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी म्हटलं आहे.

close