संजीव भट यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आयपीएस अधिकार्‍यांची संघटना

October 9, 2011 3:08 PM0 commentsViews: 11

09 ऑक्टोबर

गुजरातच्या आयपीएस अधिकार्‍यांच्या संघटनेनं भट यांच्या कुटुंबाची सर्वतोपरी मद करण्याचा एक ठराव मंजूर केला आहे. या संघटनेत 35 आयपीएस अधिकारी आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच ठराव आहे. यापूर्वी मुख्यमंत्री मोदींविरोधात भूमिका घेणार्‍या कुठल्याही पोलीस अधिकार्‍याला अशी मदत करण्यात आलेली नाही. संजीव भट सध्या अटकेत आहेत. मोदींविरोधात खोटं ऍफिडेविट सादर करण्यासाठी आपल्या ज्युनिअर सहकार्‍यावर दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, संजीव भट यांच्या पत्नीने या ठरावाचं स्वागत केलं.

close