मुंबई इंडियन्स ‘चॅम्पियन्स’ लीग टी-20 !

October 9, 2011 6:00 PM0 commentsViews: 3

09 ऑक्टोबर

मुंबई इंडियन्स चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेची नवी चॅम्पियन टीम ठरली आहे. चेन्नईमध्ये खेळवण्यात आलेल्या मेगाफायनलमध्ये मुंबईने बंगलोरवर 31 रन्सने रॉयल विजय मिळवला. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबई इंडियन्सची टीम 139 रन्सवर ऑलआऊट झाली. जेम्स फ्रँकलिनने सर्वाधिक 41 रन्स केले. पण हे सोप टार्गेट बंगलोर टीमला पेलवलं नाही. मुंबईच्या भेदक बॉलिंगसमोर बंगलोरची टीम अवघ्या 108 रन्सवर ऑलआऊट झाली. फॉर्मात असलेले ख्रिस गेल, विराट कोहली, दिलशान हे बंगलोरचे भक्कम बॅट्समन फायनलमध्ये मात्र फ्लॉप ठरले. मुंबईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली ती स्पीन बॉलर्सनं. हरभजन सिंग आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी दोन विकेट घेत मुंबईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. प्रमुख खेळाडू नसतानाही हरभजन सिंगचा नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई टीमने चॅम्पियन लीगचे जेतेपद पटकावलं. या विजयानंतर मुंबई टीमने ट्रॉफी उंचावत जल्लोष साजरा केला.

close