पहिल्या महिला लोककला संमेलनाचे थाटात उद्घाटन

October 9, 2011 1:41 PM0 commentsViews: 2

09 ऑक्टोबर

मुंबईमध्ये अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारचं संमेलन होत असून 2 दिवस हे संमेलन रंगणार आहे. यामध्ये देशभरातल्या लोक कलेचा वारसा जपणार्‍या महिला लोक कलावंत आपली कला सादर करणार आहेत.आज सकाळी या संमेलनाचे उद्घाटन झालं. त्यानंतर पद्मभूषण तिज्जनबाई यांच्या पंडवानी गायनाने मुंबईकरांची सकाळ सुरेल केली. या संमेलनात आदिवासी महिला जीवन, महाराष्ट्रातल्या संतकवयित्रींचं योगदान अशा अनेक विषयांवर परिसंवाद होत आहेत. आदिवासी नृत्य, पथनाट्यं, पोवाडा, भारूड आणि भोजपुरी संगीताबरोबरच मर्‍हाटमोळी लावणीही होणार आहे.

close