चिदंबरम यांच्या चौकशीचा निर्णय राखीव

October 10, 2011 8:58 AM0 commentsViews: 5

10 ऑक्टोबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी पी. चिदंबरम यांच्या चौकशीची मागणी करणार्‍या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली. पण कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. 2- जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात चिदंबरम यांचाही हात आहे. त्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी स्वामी यांनी केली होती. पण सीबीआयने चिदंबरम यांच्या चौकशीची मागणी फेटाळली. तसेच या प्रकरणी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम म्हणजेच एसआयटी स्थापन करायलाही सीबीआयने नकार दिला. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहेत.

close