युपीएच्या कमजोर नेतृत्त्वामुळेच भ्रष्टाचार वाढला – अडवाणी

October 10, 2011 11:26 AM0 commentsViews:

10 ऑक्टोबर

यूपीएचं सरकार सगळ्याच बाबतीत कुचकामी ठरलं आहे या पक्षात नेतृत्त्व कमजोर आहे त्यामुळेच देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे म्हणूनच भ्रष्टाचार आणि महागाई विरोधात जनचेतना यात्रेतून जनप्रबोधन करणार आहे असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे. उद्यापासून त्यांची ही यात्रा सुरू होती. आणि 20 नोव्हेंबरला संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी नवी दिल्लीत यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी अडवाणींनी आज पत्रकार परिषद घेतली होती. जयप्रकाश नारायण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही यात्रा सुरु होत असल्याचं अडवाणींनी म्हटलं आहे.

close