मोबाईलचे रोमिंग चार्जेस होणार बंद ?

October 10, 2011 11:35 AM0 commentsViews: 3

10 ऑक्टोबर

मोबाईलवरचे रोमिंग चार्जेस आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. नव्या दूरसंचार धोरणाच्या नव्या मसुद्याची घोषणा दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांनी आज केली. देशांतर्गत रोमिंग चार्जेस पूर्णपणे बंद करण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं सिब्बल यांनी सांगितलं. ग्राहकांच्या हिताकडे अधिकार लक्ष देणारी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. स्पेक्ट्रम प्रायसिंगपासून लायन्सिंग वेगळं केलं जाणार आहे. नव्या धोरणात ग्रामीण भागाच्या स्पेशल कव्हरेजवर जास्त भर देण्यात येणार आहे. दूरसंचार मंत्रालयाचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर नवं धोरण अस्तित्वात येईल.

close