सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी सीबीआयचे आरोपत्र दाखल

October 10, 2011 2:56 PM0 commentsViews: 1

10 ऑक्टोबर

नाशिक जिल्ह्यात मनमाडमध्ये झालेल्या अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीत हत्याकांडाप्रकरणी सीबीआयने 10 आरोपींवर आरोपत्र दाखल केलं आहे. या हत्याकांडातील 3 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला आहे. तर 6 लोकांवर जिवनावश्यक वस्तू कायदा अन्वये आणि दंगली प्रकरणी आरोप दाखल करण्यात आले आहे.

25 जानेवारीला यशवंत सोनवणे यांनी पोपट शिंदे यांच्या धाब्यावर पेट्रोलमध्ये भेसळ करतांना शिंदे आणि त्याच्या साथीदारांना रंगेहात पकडले होते. याचवेळी शिंदे आणि त्याच्या सहकार्‍यांनी सोनवणे यांनी जिवंत जाळले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोपट शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना अटक करण्यात आली होती. मात्र पोपट शिंदे भाजल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आज या प्रकरणी 10 आरोपींवर आरोपत्र दाखल केलं आहे. या हत्याकांडातील 3 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला आहे. तर 6 लोकांवर जिवनावश्यक वस्तू कायदा अन्वये आणि दंगली प्रकरणी आरोप दाखल करण्यात आले आहे.

close