राज्याला 3 हजार मेगावॅटचा ‘झटका’!

October 10, 2011 5:31 PM0 commentsViews: 1

10 ऑक्टोबर

ऐन दिवाळीच्या तोंडावर लोडशेडिंगमुळे वैतागलेल्या जनतेला आता 3 हजार मेगावॅट वीजेचा जोरदार झटका लागणार आहे. ओरिसात कोसळलेल्या असामानी संकटाने पुरस्थिती निर्माण झाली आहे आणि तेलंगणा आंदोलनामुळे राज्याला मिळणार्‍या कोळशाचा पुरवढा सध्या बंद आहे. त्यामुळे राज्यात 3 हजार मेगावॅट वीजेचातुटवडा आहे. त्यामुळे लोडशेडिंगमध्ये वाढ झाली आहे. असं स्पष्टीकर महावितरणने दिलं आहे. केंद्राकडून मिळणारी 1500 आणि राज्यातल्या वीज निर्मितीत 1500 मेगावॅटचा तुटवडा आहे. दररोज 24 रेक मिळणारा कोळसा सध्या 11 ते 12 रेकवर आला आहे. त्यामुळे आता उद्योगांनाही आता आठवड्यात एक दिवस लोडशेडिंगचा फटका बसणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत असं 16 तासांच हे लोडशेडिंग राहणार आहे. 12 ऑक्टोबरपासून हे लोडशेडिंग सुरू होईल. ही स्थिती तात्पुरती असून नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहनही महावितरणने केलं आहे.

दरम्यान, लोडशेडिंगविरोधात जनतेचा अंसतोष आता वाढू लागला आहे. लोडशेडिंगच्या त्रासाला कंटाळेल्या नागरिकांनी आज थेट महावितरणच्या कार्यालयालाच लक्ष केलं. नालासोपार्‍यामध्ये एमएसईबीने कोणतीही पूर्व सुचना न देता, लोडशेडिंग केल्यामुळे संतप्त झालेल्या वीजग्राहकांनी आसोळे येथील वीज कार्यालय तोडुन तेथील सामान बाहेर काढुन त्यांची जाळपोळ केली.

यामध्ये सुमारे चार लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर या नालासोपारा वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरगावकर यांनी एमएसईबीचे अधीकारी व सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परिसरात होणार्‍या वीजचोरीवर आळा का घातला जात नाही असा सवाल केला. या बैठकीत भरमसाठ वाढीव बिले कमी करण्याची मागणी केली. सर्वांच्या वतीने अशोक पेंढारी यांनी अनधिकृत बांधकामांना वीजपुरवठा त्वरीत दिला जातो. मात्र नियमीत वीज बिलं भरणार्‍यांना मात्र भुर्दंड सोसावा लागतोय. नागरिकांच्या म्हणण्यानुसार वीजचोरांकडून लाखो रुपयांचा हप्ता दिला जातो त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्या आरोप केला.वीज कार्यालयाची तोडफोड

नवी मुंबईत बेलापूरमध्ये लोडशेडिंग व्यतिरीक्तही अनेकदा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शहरातील गांधी चौकात असलेल्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवलं. पोलिसांनी महावितरणाच्या कार्यालयाला पोलीस संरक्षण दिलं. गेल्या एक वर्षातील महावितरणचे कार्यालय फोडण्याची ही चौथी घटना आहे.

गावकर्‍यांकडून कर्मचार्‍यांना मारहाण

बुलडाणा जिल्ह्यातील हिंगणा इथं गावकर्‍यांनी महावितरणच्या कर्मचार्‍यांना मारहाण केली. वीज चोरी करणार्‍यांना हे कर्मचारी मदत करत असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला. लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ त्रस्त झालेत त्यात वीज आल्यानंतर वीज चोरीमुळे गावकर्‍यांना त्याचा फटका बसतो. तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्यानच गावकर्‍यांनी कर्मचार्‍यांना चोप दिला.

close