मॅरेथॉनपटूची चहाची टपरी ; हवी हाक लढ म्हणण्याची !

October 11, 2011 12:18 PM0 commentsViews: 12

11 ऑक्टोबर

एखाद्या खेळात करिअर करायंच असेल तर तुमच्या मते कशाची गरज आहे. तुम्ही म्हणाल खेळाची आवड, मेहनतीची तयारी आणि कोचचं मार्गदर्शन….यातही चांगला कोच जास्त महत्त्वाचा…पण शिराळा तालुक्यातल्या एका छोट्या गावातून आलेल्या अशोक पाटीलला कुणी कोचच नाही. तरीही तो आंतरराष्ट्रीय धावपटूंशी स्पर्धा करेल असा मॅरेथॉनपटू आहे. घरच्या गरिबीमुळे गावाहून तो मुंबईत आला. आणि त्याचं उपजिविकेचं साधन आहे ही चहाची टपरी…या टपरीवर तो त्याचे दोन भाऊ आणि आई यांचा घरखर्च चालतो. दिवसाचंच कसंबसं भागतं त्यामुळे मॅरेथॉनपटूला लागणारा खुराक त्याला मिळतच नाही. कोचचा खर्चही न परवडणारा. तरीही हार न मानता स्वत: एकटा सराव करत तो मॅरेथॉनपटू झाला. मुंबई मॅरेथॉन, हैद्राबाद, वसई विरार अशा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये केनियाच्या धावपटूंशी स्पर्धा करत तो धावलाय. आणि शर्यत त्याने चांगल्या वेळेत पूर्णही केली. त्याला जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर या खेळात आणखी पुढे तो नक्कीच जाईल. अशी अपेक्षा त्याच्या घरच्याना आहे.

close