अडवाणींच्या रथयात्रेला उद्या बिहारमधून सुरूवात

October 10, 2011 5:55 PM0 commentsViews: 2

10 ऑक्टोबर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या भ्रष्टाचारा-विरोधातल्या जनचेतना रथयात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. गुजरातऐवजी बिहारमधील छाप्रा इथल्या जयप्रकाश नारायण यांच्या जन्मगावातून या यात्रेची सुरुवात होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अडवाणींच्या रथयात्रेला झेंडा दाखवणार आहेत. 18 राज्यांतून ही यात्रा जाणार आहे. 20 नोव्हेंबरला संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या यात्रेचा दिल्लीत समारोप होणार आहे. यात्रेचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी अडवाणींनी आज पत्रकार परिषद घेतली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए सरकारवर तोफ डागली. अण्णांच्या काँग्रेसविरोधातल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला. तसेच निवडणुकीवेळीच पंतप्रधान पदाबाबत भाजप निर्णय घेईल, हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं.

close