जे.डे हत्याकांड प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल !

October 11, 2011 1:04 PM0 commentsViews: 10

सुधाकर कांबळे, मुंबई

11 ऑक्टोबर

मिड डे चे पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास आता पूर्ण झाला आहे. यामुळे मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी या प्रकरणी लवकरचं आरोपपत्र मोक्का कोर्टात दाखल करणार आहेत. छोटा राजन गँगच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यानंच या गँगने ही हत्या घडवून आणल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

मिडे डे चे क्राईम एडिटर जे.डे यांची 11 जून रोजी हत्या झाली होती. पवईतल्या हिरानंदानी या पॉश भागात गर्दीच्या ठिकाणी ही हत्या करण्यात आली होती. या घटनेनं देशभरात खळबळ माजली होती. सुरुवातीला ही हत्या नेमकी कोणी केली हे स्पष्ट होत नव्हतं. यामुळे देशभरातील पत्रकारांनी मोर्चा काढला होता. यानंतर घटनेच्या 15 दिवसांनंतर अखेर पोलिसांनी छोटा राजन गँगच्या दोघा शूटरांना अटक केली होती. यातूनचं मग या हत्येमागे छोटा राजन असल्याचं स्पष्ट झालं.

जे.डेंच्या हत्ये प्रकरणात पोलिसांनी आता पर्यंत दहा जणांना अटक केली आहे. सुरुवातीला सतीश काल्या आणि दिपक वाघमोडे यांच्या सह सात जणांना अटक केली होती. त्यानंतर छोटा राजनचा साथीदार विनोद चेंबुर, जॉन पॉलसन आणि हत्यार पुरवणारा दिपक सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात छोटा राजन याच्यासह नयन बिष्ठ हा देखिल फरार आहे. जे.डे यांच्या हत्येचा कट छोटा राजन याने केला मग तो पद्धशीर पणे इतरांच्या मदतीने राबवण्यात आला. हा कट कसा शिजला आणि त्यासाठी कशी तयारी झाली याबाबतचे पुरावे जमवण्यात पोलिसांना यश आलं आहे. पण हे खून प्रकरण गाजलं ते या मागच्या कारणासाठी या हत्येमागे नक्की काय कारण आहे हे अजून स्पष्ठ झालेलं नाही.

या प्रकरणात पुढच्या आठवड्यात आरोपपत्र दाखल होत आहे. त्यात हत्ये मागच्या कारणांचा सविस्तर उललगजडा होणार आहे. त्याच प्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून वॉण्टेड असलेला गँगस्टर छोटा राजन याच्यावर देखिल आरोपपत्र ठेवण्यात येत आहे. यामुळे या आरोपपत्राकडे सर्वांचा लक्ष लागले आहे.

close