मंदीच्या काळातही नोकर्‍यांच्या संधी

November 17, 2008 3:00 PM0 commentsViews: 3

17 नोव्हेंबरदेशात मंदीची झळ सर्वच उद्योगांना पोहचतेय, कॉस्ट कटिंगमध्ये अनेकांच्या नोक-या जात आहेत.अशा स्थितीतही काही कंपन्यांनी जॉब मार्केटमध्ये तरुणांसाठी आशादायी चित्र उभं केलं आहे. देशातली सर्वात मोठी सार्वजनिक बँक , स्टेट बँक ऑफ इंडियानं चालू आर्थिक वर्षात त्यांच्याकडे किमान वीस हजारजणांसाठी नोक-या उपलब्ध असल्याची घोषणा केली आहे. एसबीआय त्यांच्या शाखांची संख्याही वाढवणार आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लार्सन अँड टुब्रोही येत्या तीन वर्षात दहा हजार नोक-या उपलब्ध करून देणार असल्याचं समजतंय. अमेरिकन विमा कंपनी मेटलाईफ देखील भारतातल्या शाखांसाठी येत्या पाच महिन्यात अंदाजे बत्तीस हजारजणांची नवी भरती करणार आहे. मेटलाईफ इंडियाही सुमारे शंभर नव्या शाखा सुरू करणार आहे. देशातली एक मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसनंही त्यांची पुढील वर्षात पंचवीस हजार नियुक्त्या करण्याची योजना कायम असल्याचं सांगितलं आहे.

close