जगजीत सिंग यांना अखेरचा निरोप

October 11, 2011 4:58 PM0 commentsViews: 2

11 ऑक्टोबर

आपल्या हळुवार आवाजाने सामान्यांपर्यंत गझल पोहोचवणारे गझलकिंग जगजीत सिंग यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जगजीत सिंग यांचं ब्रेन हॅमरेजनं काल लिलावती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. जगजीत सिंग यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या 'पुष्पमीलन' राहत्या घरी संगीत आणि बॉलिवूड क्षेत्रातली मंडळींनी हजेरी लावली.

close