अडवाणींच्या जनचेतना रथयात्रेला आजपासून सुरुवात

October 11, 2011 11:30 AM0 commentsViews: 1

11 ऑक्टोबर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या भ्रष्टाचारा-विरोधातल्या जनचेतना रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली. गुजरातऐवजी बिहारमधील छपरा इथल्या सिताब दियारा या जयप्रकाश नारायण यांच्या जन्मगावातून या यात्रेची सुरुवात झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अडवाणींच्या रथयात्रेला झेंडा दाखवला.

फक्त सत्ताच नाही तर व्यवस्था परिवर्तन व्हायला हवं. भ्रष्टाचाराच्या विरोधात केंद्र सरकार काहीच करत नाही. याबद्दलच जागृती करण्यासाठी आपण ही जनचेतना यात्रा काढली असल्याचं अडवाणींनी म्हटलंय. 18 राज्यांतून ही यात्रा जाणार आहे. 20 नोव्हेंबरला संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या यात्रेचा दिल्लीत समारोप होणार आहे. एकूण 75 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. ही यात्रा एकूण 38 दिवसांची आहे.

दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेवर लालू प्रसाद यादव यांनी टीका केली. ही रथयात्रा म्हणजे निव्वळ देखावा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close