आयसीसीने ‘हॉटस्पॉट’ चा निर्णय घेतला मागे

October 11, 2011 5:33 PM0 commentsViews: 2

11 ऑक्टोबर

आयसीसीने डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची बैठक सध्या दुबईमध्ये सुरू आहे आणि या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने घेतलेला हा निर्णय म्हणजे बीसीसीआयचा विजय मानला जातोय. बीसीसीआय आधीपासूनच या प्रणालीचा विरोध करत आली. हॉट स्पॉट आणि बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञान हे शंभर टक्के विश्वासार्ह नाही, असं बीसीसीआयचं म्हणणं आहे. पण ही प्रणाली वापरावी किंवा नाही हे संबधित टीमनी ठरवावं याचा पुनरूच्चार आयसीसीने केला. 14 ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या भारत आणि इंग्लंड वन डे सीरिजसाठी डिआरएस तंत्रज्ञान वापरण्यात येणार नाही.

close