लोडशेडिंगच्या विरोधात नागरिकांनी काढला कंदील मोर्चा

October 12, 2011 11:47 AM0 commentsViews: 2

12 ऑक्टोबर

बारामती शहरात आज शिवसेनेच्यावतीने महावितरण कार्यालयावर कंदील मोर्चा काढून ऊर्जामंत्री आणि महावितरणचा निषेध करण्यात आला. बारामती शहरात आणि ग्रामीण भागात होत असलेल्या अतिरिक्त भारनियमनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत त्रास होतोय. त्याशिवाय शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेलं पीकही जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोडशेडिंग कमी करुन संपूर्ण वेळ वीज उपलब्ध करुन द्यावी असं निवेदन शिवसेनेच्यावतीने देण्यात आलं. दिवाळीपूर्वी लोडशेडिंग कमी न झाल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महावितरण कंपनीला देण्यात आला.

close