‘आदर्श’च्या ठिकाणी रहिवासी इमारतीचा आर्मीला धोका !

October 12, 2011 8:50 AM0 commentsViews: 3

12 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या सुनावणीत आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट झाला. या ठिकाणी रहिवासी इमारत उभी राहिल्यास आर्मी आणि नेव्हीच्या स्थळांना धोका निर्माण होईल असा इशारा तत्कालीन डिफेन्स इस्टेट ऑफिसर सौरभ रे यांनी 2003 साली मसहूल खात्याला पत्र लिहून दिला होता. पण तत्कालीन कलेक्टर प्रदीप व्यास यांना या पत्राकडे दुर्लक्ष केल्याची माहिती महसूल विभागाचे सहसचिव रमाकांत असमार यांनी न्यायालयीन आयोगापुढे दिली. तसेच व्यास यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि मसूलमंत्र्यांनी माहिती देणं गरजेचं होतं असं असताना त्यांनी ही माहिती दिलीच नाही असंही महसूल विभागाने कबुल केलं आहे.

close