पोलीस इन्स्पेक्टर लॉजवर दंग, नागरिकांनी केलं कडी बंद !

October 12, 2011 12:17 PM0 commentsViews: 12

12 ऑक्टोबर

खून झाल्याची माहिती पोलीस इन्स्पेक्टरला मिळूनही घटनास्थळी न येता लॉजमध्ये महिलेसोबत मौज करत बसल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टी इथं घडला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाळासाहेब सकपाळ यांचा केरुल इथं तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला. या घटनेची माहिती पोलीस इन्स्पेक्टर राजाभाऊ माने यांना कळवल्यानंतरही ते घटनास्थळी आले नाही. आपण आष्टीमध्ये नसल्याचं ते सांगत होते.

पण, राजाभाऊ माने हे लॉजमध्ये एका महिले बरोबर असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्याचवेळी लोकांनी घटनास्थळी जाऊन राजाभाऊ माने ज्या खोलीत होते. त्या खोलीला बाहेरुन कडी लावून राजाभाऊ माने यांना बंद केलं आणि डीवीयएसपी वामनराव खरात यांना फोन करुन घटनास्थळी बोलावलं. त्यानंतर डीवायएसपींनी खोलीचं दार उघडल आणि खोलीची तपासणी केली असता. त्या खोलीत एक महिला आढळून आली. बाहेर खून झाला असताना राजाभाऊ माने या महिले बरोबर होते. यामुळे नागरिक संतप्त झाले होते. या प्रकरणी राजाभाऊ माने यांना निलंबित करुन त्यांना आणि त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

close