अण्णांचं पंतप्रधानांना पत्र ; जनलोकपालच आणा !

October 12, 2011 1:06 PM0 commentsViews: 1

12 ऑक्टोबर

पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी अण्णा हजारेंना काल पत्र लिहीलंय. त्यात त्यांनी आपण सशक्त लोकपाल कायदा बनवण्याबद्दल कटिबद्ध असल्याचे वचन दिलं आहे. आता या पत्राला अण्णांनी उत्तर दिलंय. पंतप्रधानांनी पत्रात बरीच आश्वासनं दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हे मान्य नाही झाली तर पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करेन असा इशारा पुन्हा एकदा अण्णांनी दिला आहे.काल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अण्णांना पत्र लिहिलं या पत्रात सशक्त लोकपाल कायदा बनवण्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की निकट भविष्यात आम्ही त्यात यशस्वी होऊ. आमचं सरकार निवडणूक सुधारणासंबंधी अनेक प्रस्तावार सक्रियतेनं विचार करतंय. ज्यात तुम्ही उल्लेख केलेल्या 'राइट टू रिजेक्ट' प्रस्तावाचा समावेश आहे. लोकशाही समाजात काही मुद्द्यांवर राजकीय सहमती आवश्यक असते. निवडणूक सुधारणांबद्दल ज्या मुद्द्यांवर साधारण सहमती बनेल, त्यांवर आम्ही कारवाई करू इच्छितो. ग्रामसभांना सशक्त करण्याबाबत मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. ग्रामसभांना खर्‍या अर्थाने अधिकार संपन्न बनवण्यासाठी आम्ही राज्यांना सोबत घेऊन सतत प्रयत्न करीत आहोत. तुम्ही दिलेल्या सल्ल्यासाठी मी तुमचा पुन्हा आभारी आहे.

अण्णांनी पंतप्रधानांच्या पत्राला उत्तर देत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत असं स्पष्टपणे सांगितले आहे जर आपल्या येत्या हिवाळी अधिवेशनात मागण्या मान्य झाल्या नाही तर जंतरमंतरवर पुन्हा आंदोलन करू असा इशारा अण्णांनी दिला.

close