अडवाणींना युपीत रॅली घेण्याची परवानगी नाकारली

October 12, 2011 5:37 PM0 commentsViews: 7

12 ऑक्टोबर

भाजपचे नेते लालक़ृष्ण अडवाणी यांची रथयात्रा वादात सापडली आहे. मुघलसराईत अडवाणींना रॅली घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने परवानगी नाकारली. रेल्वेच्या ग्राऊंडवर ही रॅली होणार होती. पण भाजपने रेल्वेकडून रीतसर ना हरकत प्रमाणपत्र घेतलं नसल्याने उत्तर प्रदेश सरकारने परवानगी नाकारली. दुसरीकडे अडवाणी यांच्या रथयात्रेला आज अडथळा आला. रथयात्रेची बस बिहारमधल्या पाटणा आणि आराच्या दरम्यान एका ब्रिजखाली अडकली. ब्रीजची उंची खूप कमी असल्याने बस अडकली. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर बस ब्रीजखालून काढण्यात यश आलं. पाटण्यात बोलताना अडवाणींनी मध्यावधी निवडणुकींची शक्यता व्यक्त केली. आणि एनडीएच सत्तेवर येणार असं भाकीत केलं.

close