नागपुरात आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण

October 13, 2011 7:37 AM0 commentsViews: 2

13 ऑक्टोबर

नागपूरच्या वर्धमान नगर भागात रहाणारे व्यापारी प्रशांत कटारिया यांच्या आठ वर्षांच्या मुलाचे अज्ञात लोकांनी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहेत. अपहरणकर्त्यांनी आठ वर्षांच्या कुश याला सोडण्यासाठी दोन कोटींची मागणी केली आहे. अपहरणकर्त्यांनी कटारिया यांच्या घरी दोन वेळा फोन केला. त्यानंतर मात्र अपहरणकर्त्यांचा कोणताही फोन न आल्याने कुशच्या सुटकेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. कुशच्या शेजारी रहाणार्‍या एका तरुणासंदर्भात कटारिया कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यामुळे वीस वर्षाच्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

close