जलतरणपटू स्वप्नालीला सरकारकडून 3 लाखांची मदत

October 12, 2011 4:19 PM0 commentsViews: 2

12 ऑक्टोबर

मुंबईच्या स्वप्नाली यादव या 12 वर्षाच्या मुलीने स्विमिंगमध्ये आपला ठसा उमटवला आहे. ग्रीसमधील मेसीनीकोस खाडी पार करणारी ती जगातील सगळ्यात लहान जलतरणपटू ठरली होती. यानंतर वयाच्या बाराव्यावर्षी तीने ऑस्ट्रेलियातील 81 किलोमीटर लांबीचा अर्जिल लेक सर करीत आणखीन एक रेकॉर्ड केला. तिच्या या कामगिरीची दखल आता राज्य सरकरानंही घेतली. स्विमिंगमधली पुढील हायटेक प्रशिक्षणासाठी अमेरिकेत जायचंय पण यासाठी तिला गरज होती 3 लाख रुपयांची. आता राज्य सरकारनंच तिला मदतीचा हात दिला आहे. राज्य क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांच्या हस्ते आज तिला 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

close