हरियाणात पाच किलो आरडीएक्स जप्त

October 13, 2011 10:46 AM0 commentsViews: 2

13 ऑक्टोबर

हरियाणातल्या अंबालामध्ये आज मोठ्या प्रमाणावर आरडीक्स साठा जप्त करण्यात आला आहे. ही स्फोटकं दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती इंटेलिजन्स ब्युरोने दिली आहे. अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबाने हे आरडीएक्स पाठवल्याचा गुप्तचर विभागाचा अंदाज आहे. हे आरडीएक्स बब्बर खालासा पाठवलं जात होतं असंही सांगण्यात येतं आहे. आज सकाळी अंबाला रेल्वे स्टेशनच्याबाहेर पार्क केलेल्या एका कारमधून पाच किलो आरडीएक्स, 5 डिटोनेटर्स आणि टायमर जप्त करण्यात आले होतं.

close