गोंदियात 600 किलो भेसळयुक्त खवा आणि कुंदा जप्त

October 12, 2011 9:22 AM0 commentsViews: 2

12 ऑक्टोबर

ऐन सणासुदीच्या काळात गोंदियामध्ये 600 किलो भेसळयुक्त खवा आणि कुंदा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी इथल्या शिवसाहर डेअरीवर छापा टाकला. या डेअरीत दुधात स्टार्च पावडर आणि केमिकल वापरुन खवा, दही, पनीर असे पदार्थ बनवण्यात येत होते. अन्न आणि औषध विभागाने पोलिसांसोबत मिळुन हा छापा टाकला होता. डेअरीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आणि दुध आणि खव्याचे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

close