लोडशेडिंगविरोधी आंदोलनमागे विरोधकांचा हात – अजितदादा

October 13, 2011 11:14 AM0 commentsViews: 3

13 ऑक्टोबर

राज्यात लोडशेडिंगविरोधात पुकारलेल्या आंदोलनामागे राजकीय पक्षांचा हात आहे. राज्यात कोणताही मोठा प्रकल्प सुरू झाला की त्यांला ही लोक विरोध करता,त हेच विरोधीपक्ष जनतेची दिशाभूल करतात असा आरोप अजित पवारांनी केला. अजित पवारांच्या आरोपाला थेट काँग्रेस प्रदेशअध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी उत्तर दिलं. लोडशेडिंगबाबत कोणतही राजकारण नाही असं स्पष्ट केलं.

राज्यभरात ऐन सनासुदीच्या तोंडावर लोकांना लोडशेडिंगला सामोर जावं लागलं आहे. अनेक भागात 13 ते 14 तास लोडशेडिंग होतं आहे. लोडशेडिंगविरोधात नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत थेट महावितरण कार्यालयावरच हल्ला चढवला. लोकांनी सरकारी मालमत्तेची नासधुस करू नये असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल केलं होतं. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांच्या आंदोलनाचा समाचार घेतं. हे आंदोलन राजकीय विरोधकांचा खटाटोप आहे असा आरोप केला. तसेच राज्यात जैतापूर सारखा प्रकल्प असो किंवा सुफीया सारखा प्रकल्प असो यांना विरोध केला जातो तसेच काही नवीन प्रकल्पांसाठी जमिनी घेण्याचा प्रयत्न केला जात असताना तिथेही विरोध करायचा, राज्यात कोळश्याचा प्रकल्प नको, तमुक प्रकल्प नको असा विरोध करणारे पक्षचं जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप अजितदादांनी केला.

close