प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला करणारे 2 जण अटकेत

October 13, 2011 11:31 AM0 commentsViews: 2

13 ऑक्टोबर

टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांच्यावर काल हल्ला करणार्‍या आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना तिलक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आहे. हल्लेखोरांपैकी स्वत:ला श्रीराम सेनेचा अध्यक्ष म्हणवणारा इंदर वर्मा याला कालच अटक करण्यात आली. तर भगतसिंग क्रांती सेना असं संघटनेचं नाव सांगणारे तेजिंदरपाल सिंह बग्गा आणि विष्णू गुप्ता या दोघांना आज अटक करण्यात आली. बग्गा याआधी भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र भाजपला हे मान्य नाही. मात्र काही फोटोेपुरावे बग्गा भाजपचा असल्याचे दाखवत आहे. अडवाणींबरोबर बग्गाचे फोटो आहेत.यापूर्वी आपण हुरियत नेते सय्य्द गिलानी आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती राय यांच्यावरही असा हल्ला केल्याचा दावा बग्गा याने केला. काश्मीरमध्ये सार्वमत घ्यावं असं वक्तव्य केल्यानंतर प्रशांत भूषण यांनी काल जबर मारहाण करण्यात आली होती.

close