झेप इस्त्रोची ; चार उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

October 12, 2011 4:38 PM0 commentsViews: 2

12 ऑक्टोबर

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने 4 सॅटेलाईट्सचे आज यशस्वी प्रक्षेपण केलं. पीएसएलव्ही-सी 18 (PSLV-C18) या रॉकेटच्या साहाय्याने श्रीहरीकोटातल्या अंतराळ केंद्रावरून हे सॅटेलाईट्स आकाशात सोडण्यात आले. हवामानाचा अंदाज सांगणार्‍या 'मेघा ट्रॉपिक्स' या महत्त्वाकांक्षी सॅटेलाईट्सचा यात समावेश आहे. भारतीय आणि फ्रेंच अंतराळ शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे ते तयार केलंय. 'मेघा ट्रॉपिक्स'सोबतच इतर तीन लहान सॅटेलाईट्सचं यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं. यापैकी दोन सॅटेलाईट्स आयआयटी (IIT) कानपूर आणि चेन्नईतल्या एसआरएम (SRM) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. तर तिसरं सॅटेलाईट युरोपमधल्या लक्झंबर्ग या देशाचं आहे.

close