खडकवासलामध्ये पोटनिवडणुकीत मतदारांचा अल्पसा प्रतिसाद

October 13, 2011 5:44 PM0 commentsViews: 4

13 ऑक्टोबर

पुण्यात खडकवासला मतदारसंघात आज विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं मात्र या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह दिसला. चार वाजेपर्यंत केवळ 32 टक्के मतदान झालंय. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हर्षदा वांजळे आणि भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्यात थेट लढत होत आहे. आज त्यांचं भविष्य मतपेटीत बंदिस्त झालं.

मनसेचे दिवगंत आमदार रमेश वांजळे यांच्या अकाली निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहेत. ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने या निवडणूकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. खडकवासला मतदारसंघातल्या एकूण 346 मतदान केंद्रापैकी 70 केंद्र ही संवेदनशील आहेत. तर त्यापैकी खेडशिवापूर इथली 2 मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे इथं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

close