अण्णांच्या आंदोलनामागे संघ – दिग्विजय सिंग

October 12, 2011 5:33 PM0 commentsViews: 2

12 ऑक्टोबर

सरकारच्यावतीने पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अण्णांना पत्र पाठवून सशक्त लोकपाल विधेयक आणण्याचं आश्वासन दिलंय. तर दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी संघाशी संबंध असल्यावरून अण्णांवर हल्ला सुरूच ठेवला आहे. पुरावा म्हणून दिग्विजय सिंग यांनी आज दोन पत्रं जाहीर केली आहेत. अण्णा आणि बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी पत्रं संघाचे प्रवक्ते सुशील मोदी यांनी लिहिली होती. तीच ही पत्रं असल्याचा दावा दिग्विजय सिंगांनी केला. दुसरीकडे लोकपाल समितीला घटनात्मक दर्जाच्या देण्याचा विचार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राहुल गांधी यांनी ही सूचना केली होती. त्यावर सरकार विचार करत आहे, असं केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितलं आहे. सरकारच्या या प्रस्तावावर टीम अण्णांनी सावध प्रतिक्रिया दिली. तर विरोधकांनी सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला.

close